पवित्र आहे,तो अल्लाह,ईमानधारक अपवित्र नसतो

पवित्र आहे,तो अल्लाह,ईमानधारक अपवित्र नसतो

अबुहुरैरा रजिअल्लाहु अनहु द्वारा नमुद आहे की: एकदा मदिना च्या रस्त्यात त्यांची भेट प्रेषितांशी झाली, त्यावेळी ते स्वतःअशुद्ध अवस्थेत होते, अबुहुरैरा रजि, गुपचुप लवकर तिथुन पसार झाले,व गुस्ल [आंघोळ] करता परत आले, प्रेषितांनी विचारले,अबुहुरैरा कुठे गेले होते? त्यावर‌अबुहुरैरा रजिअल्लाहु अनहु उत्तरले की, मी अशुद्ध अवस्थेत होतो, व‌ मला आवडले‌ नाही , की मी तुमच्यासोबत अशुद्ध अवस्थेत वावरावे, प्रेषित सल्लल्लाहु अलैही व सल्लम नी फरमाविले,पवित्र आहे,तो अल्लाह,ईमानधारक अपवित्र नसतो>>.

[صحيح] [متفق عليه]

الشرح

मदिन्याच्या एका रस्त्यावर नबी करिम यांची भेट अबू हुरैरा यांच्याशी झाली, त्या वेळी अबू हुरैरा जनाबत (अपवित्रता) स्थितीत होते, त्यांना असे वाटले की अशा अवस्थेत आपल्या सोबत बसणे किंवा संवाद साधणे योग्य नाही, त्यांना वाटले की ते अशुद्ध आहेत, म्हणून ते हळूच तेथून निघून गेले, घुस्ल (अंघोळ) केली आणि नंतर परत येऊन नबी समोर बसले. तेव्हा नबी यांनी त्यांना विचारले की ते कुठे गेले होते? यावर अबू हुरैरा रजिअल्लाहु अनहु यांनी आपली स्थिती सांगितली आणि म्हटले की ते जनाबत (अशुद्धता) स्थितीत असल्यामुळे रसूलचा समोर बसणे योग्य समजत नव्हते, हे ऐकून नबी करिम आश्चर्यचकित झाले आणि म्हणाले: निश्चितच, मोमिन व्यक्ती पवित्र असते आणि कोणत्याही परिस्थितीत अपवित्र होत नाही; ना जिवंत असताना आणि ना मृत्यूनंतर.

فوائد الحديث

जनाबत फक्त नमाज पठण करण्यापासून, कुराणला स्पर्श करण्यापासून आणि मशिदीत राहण्यापासून प्रतिबंधित करते. हे एखाद्याला मुस्लिमांसोबत बसण्यापासून किंवा भेटण्यापासून रोखत नाही आणि मोठ्या धार्मिक अशुद्धतेच्या स्थितीत असलेली व्यक्ती त्यामुळे अशुद्ध होत नाही.

जिवंत आणि मृत आस्तिकाची पवित्रता.

धर्म ज्ञानी, उच्चपदस्थ व सत्कर्मी लोकाचा आदर करणे व सुअवस्थेत त्यांच्या सहवासात राहणे आवश्यक आहे.

अबुहुरैरा रजिअल्लाहु अनहु चं प्रेषित मुहम्मद सल्लल्लाहु अलैही व सल्लम यांना न सांगता निघणे, त्याऐवजी आपल्या गुरुजनांची परवानगी घेउन निघणे,रास्त आहे, हे चांगल्या कर्मा पैकी आहे.

अकस्मात वाटता वेळी :सुबहान अल्लाह म्हणजे पवित्र आहे तो अल्लाह

म्हणने साबीत आहे.

आपली चुक असली तर तिचा स्वीकार करणे जरुरी आहे मग ते कार्य लाजीरवाणे असले तरी हरकत नाही, कारण त्यापासुन अनेक वाद उत्पन्न होत नाहीत.

नास्तिक अपवित्र असतो, परंतु त्याच्या श्रद्धेच्या दुष्टतेमुळे त्याची अशुद्धता आध्यात्मिक असते.

ईमाम नववी रहमतुल्लाह या हदिस बाबत स्पष्ट करतात की:ही हदिस आपणास शीकविते की, धर्मज्ञानी समोर कुणी असं क्रुत्य करत असेल जे चुकीचं असण्याची शक्यता आहे तर त्यांनी त्याबाबत विचारपुस केली पाहिजे.मग त्याला सत्यता सांगितली पाहिजे.व त्याला त्याबाबत आदेश दाखवला पाहिजे, अल्लाह च सर्वश्रेष्ठ ज्व ज्ञान राखणारा आहे.‏

التصنيفات

Removing Impurities, Ritual Bath