إعدادات العرض
तुमच्या पुर्वी एक बादशाह होता,व त्याच्या जवळ एक जादुगर
तुमच्या पुर्वी एक बादशाह होता,व त्याच्या जवळ एक जादुगर
सोहीब बिन सनान रुमी {अल्लाह राजी व्हावे यांच्याशी} द्वारा निवेदन आहे की, प्रेषित मुहम्मद सल्लल्लाहु अलैही व सल्लम नी फरमाविले: तुमच्या पुर्वी एक बादशाह होता,व त्याच्या जवळ एक जादुगर होता, पण तो जादुगार वयस्कर झाला व त्याने बादशहा ला सांगितले की आता मी थकलो, तुम्ही माझ्या सोबत एक युवक पाठवा,ज्याला मी विद्या शिकवितो.त्या बादशहा ने जादुगार कडे एक मुलगा पाठवला,तो मुलगा जादुगार कडे जाण्यास निघाला असता,त्याला एक राहीब [एक ख्रिश्चन पादरी] दिसला,व त्याची शिकवण त्या मुलाला आवडली.व तो तिथेच रमु लागला.परंतु काळांतराने त्या मुलाला त्या राहीब ची बैठक खुपचं आवडायची वत्याला जादुगार पर्यंत पोहोचण्यास ऊशीर व्हायचा, जादुगार त्याला तंबी द्यायचा व मारायचा.या जादुगार ची शिकायत त्याने राहीब कडे केली असता,राहील ने त्याला सांगितले की,तु जादुगार ला घरच्या मंडळींनी उशीर केल्याचं कारण सांगायचं व घरच्यांनी विचारल्यास त्यांना जादुगर ने थांबवल्याचं कारण सांगायचं.त्यादरम्यान भररस्त्यात एका विषारी जनावराने आमरस्ता जाम केला. त्यावर त्या युवकाने एक युक्ती लढवली.त्याने म्हटले आज मी बघतोच की जादुगर सत्यावर सत्यावर आहे् की राहीब? त्याने एक दगड उचलला व म्हणाला,हे , अल्लाह ,तुला जर राहिब चा मार्ग जादुगार पेक्षा पसंद असेल तर या जनावराला नष्ट कर, लोकांना मार्ग मोकळा कर." मग त्याने एक दगड त्या जनावराला मारतच ते जनावर मरण पावले व लोकं निघुन गेली.तो मुलगा राहिब जवळ सर्व व्रुत्तांत सांगु लागला.त्यावर राहिब ने युवकाला उद्देशुन म्हटले की,तु आता माझ्यापेक्षाही पुढे निघालास.व तुझी उच्चता प्रगतीपथावर आहे.पण तुला लवकरच परिक्षेला तोंड द्यावे लागेल.परंतु परिक्षेवेळी माझे नाव घेउ न कोस.पुढे तो मुलगा जन्मतः आंधळयांना व कोड च्या रोग्यांना दुरुस्त करत होता.जवळपास सर्वच आजाराचे इलाज तो करत होता. तद्नंतर बादशहा चा एक मित्र आंधळा झाला.त्याने त्या मुलाकडे विनवणी केली की तु मला माझे डोळे परत आणुन दिल्यास, मी सोबत आणलेले सर्व उच्च भेटवस्तू तुला अर्पण करेन.त्या युवक बादशाह च्या मित्राला म्हणाला की,मी तर कुणालाच तंदुरुस्ती प्रदान करु शकत नाही.तंदुरुस्ती देणारा फक्त एकमेव अल्लाह च आहे.जर तुम्ही त्या एकमेव अल्लाह वर (ईमान)श्रद्धा बाळगशील तर मी अल्लाह जवळ तुमच्या तंदुरुस्तीसाठी दुआ याचना करतो.तुम्हाला पुर्ण तंदुरुस्ती प्रदान व्हावी.मग त्या व्यक्तीने अल्लाह वर ईमान आणले.व अल्लाह ने त्याला आजारापासून मुक्ती दिली.व तो बरा झाला. मग तो व्यक्ती बादशहा जवळ आला,जवळ येऊन बसला,त्यावर बादशहा ने विचारले की तुझे डोळे परत कुणी आणले? त्यावर तो व्यक्ती ऊत्तरला,"माझ्या पालनकर्ता ने.त्यावर बादशहा ने प्रश्न केला, की माझ्या व्यतिरिक्त अजुन कोण पालनकर्ता आहे? तो व्यक्ती म्हणाला,तुझा व माझा पालनकर्ता अल्लाह आहे. मग बादशहा त्या व्यक्तीला सजा देऊ लागला.त्यावर त्याने बादशहा ला त्या मुलाचे नाव सांगितले.मग दरबारात त्या मुलाला हजर करण्यात आले.बादशाहने त्या मुलाला विचारले की,हे ,युवका काय तुझी जादु ची पहुच ईतकी वाढली की तु आंधळयांना डोळे प्रदान करतो व जन्मतः कोडी ला बरे करतोस.मुलगा उत्तरला,मी तर कुणालाच बरं करू शकत नाही.बरं करणारा तर एकमेव अल्लाह आहे.असं म्हणताच बादशहा ने त्या मुलाला मारणे व सजा देणे सुरू केले.त्याने त्या राहिब [भिक्शु ]चं नाव सांगताच,त्याला दरबारी हजर करण्यात आले . त्याला धर्म सोडण्यास सांगण्यात आले.त्याने धर्म सोडण्यास नकार दिला.बादशाह च्या आदेशाने करवत राहीब च्या डोक्यावर ठेऊन त्याचे दोन तुकडे करण्यात आले.त्यानंतर बादशहा ने त्या मित्राला बोलावले.त्याला सांगण्यात आले की तुझा धर्म सोडुन दे! त्याने सुद्धा नकार दिला.त्याला बेरहमी ने दोन तुकडे करून मारण्यात आले. तद्नंतर त्या मुलाला बोलावण्यात आले,त्याला पुन्हा धर्म सोडण्यास सांगण्यात आले.पण त्याने नकार दिला.मग बादशहा ने आपल्या सहकाऱ्यांना त्याला एका उंच पहाडावर घेउन जा व जर याने धर्म सोडला तर त्यखला सोडुन द्या.व जर त्याने नकार दिल्यास त्याला ऊंचीवरुन फेकुन देण्यास सांगितले.त्याला पाठीवर नेण्यात आले.त्या मुलाने अल्लाह जवळ याचना केली की,हे! अल्लाह! तु माझ्याकरता पुरेसा आहेस, तुला पाहिजे त्या मार्गाने मला वाचव! लगेच पाठीवर भुकंप आले व सर्व बादशहा ची माणसे ठार झाली. व तो मुलगा परत दरबारी हजर झाला.बादशाह ने विचारले की साथीदारांचे काय झाले? तो म्हणाला की, अल्लाह ने मला त्यांच्यापासून वाचवले.मग बादशहा ने पुन्हा काही माणसाच्या त्या मुलाला हवाली केले व सांगितले की याला दुर नाव मध्ये बसला व जर याने धर्म सोडला तर त्याला सोडून द्या.अन्यथा त्याला समुद्रात लोटुन द्यावे.एका बोटीत घेउन गेले.असता मुलाने अल्लाह कडे पुन्हा याचना केली की,हे! अल्लाह!तु मला तुझ्यापरीने वाचव! मग ती बोट अचानक पलटी झाली.व सर्व बादशहा ची माणसे डुबुन मरण पावली.तो मुलगा पुन्हा बादशहा दरबारी हजर झाला.बादशाह ने विचारले की सोबत गेलेल्यांचं काय झालं? मुलगा म्हणाला की मला अल्लाह ने त्यांच्यापासून वाचविले.तदनंतर मुलगा बादशहा ला उद्देशून म्हणाला की,तु मला तोपर्यंत मारु शकत नाहित , जोपर्यंत हि सांगीतलेल्या पद्धतीने तुम्ही मला मारणार नाही.बादशाह म्हणाला की, ती कोणती पद्धत आहे? सर्व लोकांचे काच मैदानात जमा करावे,व मला सुलीवर लटकवा.मग माझ्या भात्यातुन एक बाण घ्या व तो कमानच्या मध्यभागी ठेवा.व म्हणा,"त्या अल्लाहच्या नावाने,जो या मुलाचा प्रभु आहे." मग मला बाण मारा,या पद्धतीने तुम्ही मला फार करु शकता.मग बादशहा ने लोकांना एका मैदानात जमा केले.मुलाला सुलीवर लटकवण्यात आले.मग त्याच्या भात्यातुन एक बाण काढला.त्याला कमाणीच्या मध्यभागी ठेवण्यात आले.व म्हणण्यात आले,"त्या अल्लाहच्या नावाने जो या मुलाचा प्रभु आहे.मग तो बाण जरा त्या मुलाला मारण्यात आला.तो बाण सरळ त्या मुलाच्या कवटीत लागला.त्या मुलाने आपला हात त्या बाण लागलेल्या जागेवर ठेवला व तो मरण पावला.सर्व लोकं म्हणाले, आम्ही या मुलाच्या प्रभुवर,ईमान आणले, आम्ही या मुलाच्या प्रभुला माणले.आम्ही या मुलाच्या प्रभुवर ईमान आणले.बादशाह ला सांगण्यात आले की ज्याची तुला भिती होती,तेच घडले.लोकानी अल्लाह वर ईमान आणले आहे. बादशहा ने दरबाराच्या दरवाजावर खंदक खोदण्याचा आदेश दिला.खंदक खोदण्यात आली. त्यात आग भडकवण्यात आली.आदेश देण्यात आला की जो या मुलाचा धर्म सोडणार नाही, त्याला या खंदक मधे ढकलुन द्यावे.लोकानी तसंच केलं परंतु एक महिला आली,तिच्यासोबत एक बाळ होतं.ती महिला त्या अग्नीत जाण्यास घाबरली,मागे सरकली,त्यवर ,ते बळ बोलुन लागलं,"हे ,आई! संयम ठेव तु सत्यावर आहेस ".
الترجمة
العربية Bosanski English Español فارسی Français Bahasa Indonesia اردو 中文 हिन्दी Kurdî Русский Tiếng Việt Magyar ქართული Kiswahili සිංහල Română অসমীয়া Hausa ไทย Português ភាសាខ្មែរ دری አማርኛ বাংলা ગુજરાતી Македонски Nederlands Tagalog ਪੰਜਾਬੀالشرح
त्याने अल्लाहच्या मेसेंजर (अल्लाहचे शांती आणि आशीर्वाद त्याच्यावर असो) ला सांगितले की मी लोकांचा राजा आहे आणि त्याच्यासोबत एक जादूगार होता, म्हणून जादूगार राजाला म्हणाला: मी म्हातारा झालो आहे, म्हणून एका तरुणाला जादू शिकवण्यासाठी माझ्याकडे पाठवा. म्हणून राजाने त्याला शिकवण्यासाठी एका तरुणाला पाठवले. जेव्हा जेव्हा तो तरुण जादूगाराकडे जायचा तेव्हा वाटेत एक साधू असायचा. एकदा मी त्यांच्या शेजारी बसून त्यांचे भाषण ऐकले आणि मला ते आवडले. जेव्हा जेव्हा तो जादूगाराकडे यायचा तेव्हा तो त्या साधूजवळून जात असे आणि त्याच्या शेजारी बसत असे. तो जेव्हा जेव्हा जादूगाराकडे यायचा तेव्हा तो त्याला उशिरापर्यंत मारहाण करायचा. त्याने याबद्दल भिक्षूकडे तक्रार केली, तो म्हणाला: जर तुम्हाला जादूगाराची भीती वाटत असेल तर सांगा: माझ्या कुटुंबाने मला थांबवले. आणि जर तुम्हाला तुमच्या कुटुंबाची भीती वाटत असेल तर म्हणा: जादूगाराने मला थांबवले आहे. तो असाच असताना, त्याला एक प्रचंड प्राणी दिसला जो लोकांना तिथून जाण्यापासून रोखत होता. तो म्हणाला: आज मला कळेल की जादूगार चांगला आहे की साधू. म्हणून त्याने एक दगड घेतला आणि म्हणाला: हे देवा, जर तुला जादूगाराच्या आज्ञेपेक्षा साधूची आज्ञा जास्त प्रिय असेल तर या प्राण्याला मार म्हणजे लोक मरतील. म्हणून त्याने ते फेकले आणि मारले आणि लोक मेले. मग तो साधूकडे आला आणि त्याला सांगितले, आणि साधूने त्याला म्हटले: बेटा, आज तू माझ्यापेक्षा चांगला आहेस. मी जे पाहतो ते तुमच्यापर्यंत पोहोचले आहे आणि तुमची परीक्षा होईल. जर तुम्हाला मोह झाला असेल तर ते मला दाखवू नका. या मुलाने अल्लाहच्या आज्ञेने आंधळे आणि कुष्ठरोगी बरे केले आणि सर्व आजार बरे केले. जेव्हा राजाच्या एका साथीदाराने त्या माणसाची दृष्टी गेली असल्याची बातमी ऐकली तेव्हा तो त्याच्याकडे अनेक भेटवस्तू घेऊन आला. तो मुलाला म्हणाला: जर तू मला बरे केलेस तर या सर्व भेटवस्तू तुझी आहेत. तो म्हणाला: मी कोणालाही बरे करत नाही, फक्त अल्लाहच बरे करतो. जर तुम्ही अल्लाहवर विश्वास ठेवत असाल तर मी अल्लाहला हाक मारेन आणि तो तुम्हाला बरे करेल. म्हणून त्याने अल्लाहवर विश्वास ठेवला आणि अल्लाहने त्याला बरे केले. मग तो राजाकडे आला आणि तो बसला असताना त्याच्या शेजारी बसला. राजा त्याला म्हणाला: तुझी दृष्टी कोणी परत आणली? तो म्हणाला: माझ्या रब्ब. तो म्हणाला: माझ्याशिवाय तुमचा कोणी रब्ब आहे का? तो म्हणाला: माझा आणि तुमचा रब्ब अल्लाह आहे. म्हणून तो तिला घेऊन गेला आणि तिने त्याला मुलगा दाखवेपर्यंत तिचा छळ केला. मग त्या मुलाला आणण्यात आले आणि राजा त्याला म्हणाला: बेटा, तुझी जादू इतकी वाढली आहे की तू आंधळ्यांना आणि कुष्ठरोग्यांना बरे करू शकतोस, आणि तू ते करतोस आणि करतोस. तो म्हणाला: मी कोणालाही बरे करत नाही, फक्त अल्लाहच बरे करतो. म्हणून तो तिला घेऊन गेला आणि तिने साधूला इशारा करेपर्यंत तिचा छळ केला. साधूला आणण्यात आले आणि सांगण्यात आले: तुमचा धर्म परत द्या. त्याने नकार दिला, म्हणून त्याने करवत मागवली, ती त्याच्या डोक्याच्या मध्यभागी ठेवली आणि ती अर्धी कापली. मग राजाच्या साथीदाराला आणण्यात आले आणि त्याला त्याच्या धर्मापासून परत जाण्यास सांगण्यात आले. जेव्हा त्याने नकार दिला तेव्हा त्याच्या डोक्यावर करवत ठेवण्यात आली आणि त्याचे दोन भाग करण्यात आले. मग त्या मुलाला आणण्यात आले आणि त्याचा धर्म सोडण्यास सांगितले, पण त्याने नकार दिला, म्हणून त्याने त्याला त्याच्या साथीदारांपैकी तीन ते दहा पुरुषांच्या स्वाधीन केले. तो (सल्लल्लाहु अलैहि वसल्लम) म्हणाला: त्याला अशा डोंगरावर घेऊन जा आणि त्याच्यासोबत डोंगरावर चढा. जेव्हा तुम्ही वर पोहोचाल, जर त्याने त्याचा धर्म सोडला तर त्याला खाली फेकून द्या. म्हणून ते त्याच्याबरोबर गेले आणि त्याच्याबरोबर डोंगरावर चढले. तो मुलगा म्हणाला: हे अल्लाह, तुला पाहिजे तिथे मला त्यांच्यापासून वाचव. डोंगर हादरला आणि जोरात हालला आणि ते खाली पडले. तो राजाकडे चालत गेला. राजा त्याला म्हणाला: तुझ्या साथीदारांचे काय झाले? तो म्हणाला: अल्लाहने मला त्यांच्यापासून वाचवले. त्याने (सल्लल्लाहु अलैहि वसल्लम) त्याला त्याच्या साथीदारांच्या एका गटाच्या स्वाधीन केले आणि म्हटले: त्याला घेऊन जा आणि एका लहान होडीत बसवा आणि समुद्राच्या मध्यभागी घेऊन जा. जर त्याने त्याचा धर्म सोडला तर ठीक आहे. नाहीतर, समुद्रात फेकून द्या. म्हणून त्यांनी त्याला पकडले आणि तो म्हणाला: हे अल्लाह, तुला पाहिजे त्या मार्गाने मला त्यांच्यापासून वाचव. मग बोट उलटली आणि ते बुडाले, आणि तो राजाकडे आला. राजा त्याला म्हणाला: तुझ्या साथीदारांचे काय झाले? तो म्हणाला: अल्लाहने मला त्यांच्यापासून वाचवले. तो मुलगा राजाला म्हणाला: मी जे सांगतो ते तू केल्याशिवाय तू मला मारू शकत नाहीस. तो म्हणाला: ते काय आहे? तो म्हणाला: लोकांना एका प्रमुख ठिकाणी एकत्र करा आणि मला झाडाच्या खोडावर वधस्तंभावर चढवा. मग माझ्या भात्यातून एक बाण घे आणि तो बाण धनुष्याच्या हातावर ठेव. मग म्हणा: अल्लाहच्या नावाने, त्या मुलाच्या स्वामी, मग मला गोळी घाला. जर तू असं केलंस तर तू मला मारून टाकशील. म्हणून त्याने लोकांना एकत्र केले आणि त्याला झाडाच्या खोडावर वधस्तंभावर खिळले. मग त्याने त्याच्या भात्यातून एक बाण काढला आणि तो बाण धनुष्याच्या मध्यभागी ठेवला. मग तो म्हणाला: देवाच्या नावाने, त्या मुलाच्या स्वामीच्या नावाने, मग त्याने त्याला गोळी मारली. बाण त्याच्या डोळ्यात आणि कानात घुसला. त्याने बाण जिथे होता तिथे हात घातला आणि तो मेला. लोक म्हणाले: आम्ही त्या मुलाच्या रब्बावर विश्वास ठेवतो, आम्ही त्या मुलाच्या रब्बावर विश्वास ठेवतो, आम्ही त्या मुलाच्या रब्बावर विश्वास ठेवतो. मग राजाला आणण्यात आले आणि विचारण्यात आले: तुला कशाची भीती वाटत होती ते तू पाहिलेस का? अल्लाहची शपथ, ज्याची मला भीती होती तीच तुमच्या बाबतीत घडली आहे: लोक या मुलाचे अनुसरण करतील आणि त्याच्या पालनकर्त्यावर विश्वास ठेवतील. म्हणून त्याने रस्त्यांच्या प्रवेशद्वारांवर जमिनीत मोठे आयताकृती खड्डे खोदण्याचा आणि त्यामध्ये आग लावण्याचा आदेश दिला आणि तो म्हणाला: "जो कोणी आपला धर्म सोडत नाही त्याला त्यात टाका." म्हणून त्यांनी राजाने आज्ञा केल्याप्रमाणे केले, जोपर्यंत एक स्त्री तिच्या लहान मुलाला घेऊन आली आणि ती जिथे होती तिथेच राहिली, तिला अग्नीत जाणे आवडत नव्हते. म्हणून त्याचा तरुण मुलगा त्याला म्हणाला: अरे आई, धीर धर कारण तू योग्य मार्गावर आहेस.فوائد الحديث
अल्लाह चे सदाचारी दास ज्यांच्याद्वारे चमत्कार घडतात,किस्स्या मधे एका लहान बालकाच्या दगड मारल्याने जनावर मरण पावला, आणि त्या मुलाची प्रार्थना दोन वेळा स्वीकारली गेली, आणि बालकाने (दुध पिणाऱ्या बाळाने) बोलले.
जो एकमेव अल्लाह वर विश्वास ठेवतो अल्लाह त्याची जरुर मदत करतो.
धर्मा वर गाढ श्रद्धा व संयमी व्रुत्ती चे महान दर्जे.
लवकरात लवकर कोणत्याही गोष्टीला शीकायला हवं, अन्यथा युवावस्थेत बुद्धी मजबूत असते पण वयस्कर झाल्यावर बुद्धी तेवढी मजबुत राहत नाही.
वरील संपुर्ण किस्स्यात त्या मुलाच्या ठाम अल्लाह वर असणारी श्रद्धा झळकते व अत्यंत बिकट व जिवघेण्या परिस्थितीत तो आपल्या श्रद्धा व ईमान पासुन ईंचभर हि मागे सरकला नाही.
कठीण संकटात व परेशानीत, श्रद्धावान दास ज्या ज्या वेळी एकमेव प्रभु अल्लाह ला पुकारतो त्या त्या वेळी सर्वोच्च अल्लाह आपल्या सदाचारी दासाची याचना ऐकतो व मदतीस धावुन येतो.
आम मुसलमान बांधवांच्या हितासाठी स्वताला परेशानीत लोटणं वैध आहे, जसं या मुलाने बादशहा ला सांगितले की कशाप्रकारे त्याला मरण येऊ शकते, एक बाण घेउन त्यावर: एकमेव अल्लाह चे नाव घ्यावे,हे! मुलाच्या प्रभुवंता! बाण मारावा.
स्वताला संकटातुन वाचवण्यासाठी युद्धात खोटं बोलण्याची परवानगी आहे.
ईमानधारकाला आजमावल्या जावु शकते, त्याच्या ईमान ची सत्यता व सत्यावर ठाम राहल्यामुळे त्याला आपला जिव गमवावा लागु शकतो.
एकमेव अल्लाह च्या मार्गाकडे लोकांना आमंत्रित करणे व सत्य स्पष्ट करताना त्याग करणे जरुरी आहे.
माणसांची मनं अल्लाहच्या हातात असतात, ज्याला तो ईच्छीतो सरळ मार्ग दाखवतो, व ज्याला ईच्छीतो मार्गभ्रष्ट करतो, किंबहुना त्या अल्लाहने या मुलाला सरळ मार्ग दाखवला,जो एका जादुगार जवळ जादु शीकत होता.
एकमेव अल्लाह कडे अशी याचना आपण करु शकतो की, आपल्या दासाला असे चिन्ह दाखवावे,ज्याने दासाची खात्री व ईमान मधे व्रुद्धी होईल.
ईमानधारक अल्लाह कडे आमंत्रित करताना त्या सर्व पर्याय चा उपयोग घेतात,जे एकमेव अल्लाह ने त्यांना प्रदान केले आहे.
मनुष्याला संपवण्याचे पुर्ण रस्ते अल्लाह च्या हातात आहे, तो ज्याला ईच्छीतो नष्ट करतो व ज्याला ईच्छीतो वाचवु शकतो.
अविश्वासु लोकांकडे एकमेव अल्लाह वर विश्वास आणण्यासाठी पुरेसे प्रमाण आहेत, परंतु त्यांना त्यांचा अहंकार व गर्व विश्वास व श्रद्धा बाळगण्यास परावृत्त करतो.
अत्याचारी व जुलमी लोकं नेहमीच आम लोकांना ठार करण्याच्या तयारीत असतात, त्याद्वारे ते नैसर्गिक संपदेवर प्रभुत्व राखावे.
अत्याचाऱ्याला सर्वोच्च अल्लाह असा बदला देतो, त्यांनी कधी कल्पनाही केली नसेल, जसं की लोकांनी त्या मुलाच्या प्रभु अल्लाह वर ईमान आणले ज्यावेळी त्यांनी बघीतले की हा मुलगा आपल्या श्रद्धेत[ विश्वासात] खरा आहे, व तो कोणत्याही निंदकाच्या निंदेने घाबरत नाही.
ईसा [अलैसलाम] च्या ऐवजी या कहानीत एक बालक तान्ह्या अवस्थेत काखेतच आईशी बोलु लागला, हे प्रमाण आहे की प्रेषित मुहम्मद {सल्लल्लाहु अलैही व सल्लम} नी जी हदिस सांगीतली ती सत्यावर आधारित आहे, जगात फक्त तिनच तान्ही बाळ आईच्या कडेवर बोलु लागली, व प्रेषितांनी त्यांना बनी ईस्राईल करता खास केले.
