जो माणुस आपल्या मुली बाबत आजमावल्या जाईल,व त्याने त्यांच्या सोबत सदव्यवहार केला.तर त्या मुली त्यांच्या…

जो माणुस आपल्या मुली बाबत आजमावल्या जाईल,व त्याने त्यांच्या सोबत सदव्यवहार केला.तर त्या मुली त्यांच्या वडीलांकरता नरका च्या अग्नी पासुन ढाल व आड बनतील

आईशा रजिअल्ला अनहा वर्णन करते की: माझ्या घरी एका दिवसी एक महिला आली, तिच्यासोबत दोन लहान मुली होत्या, तिने मला काही मागीतले, परंतु माझ्याकडे एक खजुर च्या ऐवजी काहीच नव्हते, मी तिला एक खजुर दिली, तिनं त्या खजुर चे दोन तुकडे केले व दोन्ही मुलींना वाटुन दिले व स्वतः काहीच खाल्ले नाही, मग ती निघुन गेली, तेवढ्यात प्रेषित मुहम्मद सल्लल्लाहु अलैही व सल्लम घरी आले, मी सर्व किस्सा प्रेषितांना ऐकविला, त्यावर प्रेषित म्हणाले:<<जो माणुस आपल्या मुली बाबत आजमावल्या जाईल,व त्याने त्यांच्या सोबत सदव्यवहार केला.तर त्या मुली त्यांच्या वडीलांकरता नरका च्या अग्नी पासुन ढाल व आड बनतील>>.

[صحيح] [متفق عليه]

الشرح

आईशा रजिअल्ला अनहा च्या घरी एक महिला आली व तिच्या सोबत दोन मुली होत्या, व ती महिला गरीब होती व या आईशा रजिअल्ला अनहा ला काही मागणी करत होती, मा आईशा रजिअल्ला अनहा जवळ तिला द्यायला काहीच नव्हते, फक्त एक खजुर होती, त्यांनी तिला एक खजुर देउन टाकली, त्या महिलेने त्या खजुर चे दोन भाग केले व दोन्ही मुलींना वाटुन दिली, व स्वतः काहीच खाल्ले नाही, प्रेषित {अल्लाह ची सलामती असो त्यांच्यावर} जेव्हा मा आईशा रजिअल्ला अनहा च्या घरी आले, त्यांनी सर्व व्रुत्तांत सांगितला:प्रेषित मुहम्मद सल्लल्लाहु अलैही व सल्लम नी फरमाविले की: ज्या माणसाला आपल्या मुली विषयी परिक्षेत टाकल्या गेले, व तरीही त्याने त्यांच्या सोबत सदव्यवहार केला, तर त्या मुली बापाकरता नरकाच्या आगी पासुन ढाल व आड बनतील.

فوائد الحديث

मुलींचे संगोपन करणे आणि त्यांच्या खर्चासाठी प्रयत्न करणे हे अशा उत्तम सत्कर्मांपैकी आहे, जे मनुष्याला नरकाच्या आगीतून वाचवतात.

माणसाने आपल्या क्षमतेनुसार दान करावे, जरी ते थोडेसेच का असेना.

पालकांची आपल्या मुलांवर अपार माया.

पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम

यांच्या घरांच्या परिस्थितीचे वर्णन करणे आणि त्यांचे उपजीविकेसाठी मिळणारे साधन फक्त गरजेपुरतेच असत होते.

परोपकाराची महत्त्वता आणि तो श्रद्धावानांच्या विशेष वैशिष्ट्यांपैकी एक असल्याचे सांगणे; जसे की आइशा रज़ियल्लाहु अन्हा ने त्या स्त्री आणि तिच्या मुलींना स्वतःपेक्षा प्राधान्य दिले, आणि हे तिच्या उदारते आणि दानशीलतेचे दाखले आहे, जरी तिला तीव्र गरज होती.

मुलींचा जन्म घेणे ही एक परीक्षा म्हणुन ओळखली जाते; कारण त्यांची संगोपन करताना अडचणी आणि मेहनत लागते, किंवा काही लोकांना त्यांच्यापासून तडजोड असते, किंवा म्हणून की सामान्यतः त्यांच्यासाठी कमाई आणि उपजीविकेचा स्रोत कमी असतो.

इस्लामने जाहिलीयतच्या नापसंदीच्या प्रथांचा नाश केला, आणि त्यापैकी एक म्हणजे मुलींशी चांगले वर्तन करण्याची शिफारस केली.

हा सवाब त्यालाही मिळतो ज्याची फक्त एकच मुलगी आहे, जसे काही हदीसांमध्ये नमूद आहे.

التصنيفات

Praiseworthy Morals, Voluntary Charity