मी आई आईशा रजिअल्ला अनहा ला एकदा प्रश्न केला की, मासीक पाळी मुळे सुटलेले उपवास ची भरपाई द्यावी लागते, म्हणजे…

मी आई आईशा रजिअल्ला अनहा ला एकदा प्रश्न केला की, मासीक पाळी मुळे सुटलेले उपवास ची भरपाई द्यावी लागते, म्हणजे पुन्हा ठेवावे लागतात, परंतु त्या काळात सुटलेली नमाज

मुआजाह रजिअल्लाहु अनहा वर्णन करतात की: मी आई आईशा रजिअल्ला अनहा ला एकदा प्रश्न केला की, मासीक पाळी मुळे सुटलेले उपवास ची भरपाई द्यावी लागते, म्हणजे पुन्हा ठेवावे लागतात, परंतु त्या काळात सुटलेली नमाजपुन्हा अदा करण्याची गरज नाही असे का बरं? आई आईशा रजिअल्ला अनहा उत्तरली, तुम्ही हरूरीया पंथा पैकी तर नाही? मी म्हणालो, नाही मी हरूरीया पैकी नाहीच! फक्त प्रश्न केला आहे, त्यावर आईशा रजिअल्ला अनहा म्हणाली: आम्हाला मासीक पाळी यायची, व आम्हाला उपवास पुन्हा ठेवण्याचा आदेश दिला जायचा, परंतु नमाज ला पुनश्च अदा करण्याचा आदेश नव्हता.

[صحيح] [متفق عليه]

الشرح

एकदा मआजत रजिअल्ला अनहा माई आईशा रजिअल्ला अनहा कडे प्रश्न करत म्हणाली:की कोणतं कारण आहे ज्यामुळे ऊपवासाची [पुर्ण करणे]कजा अनिवार्य करण्यात आली जे उपवास ती ठेउ शकली नाही तसेच मासीक पाळी दरम्यान सुटलेल्या नमाज ची कजा [पुन्हा] अनिवार्य केली नाही? माई आईशा रजिअल्ला अनहा म्हणाली की:तु हरुरीया म्हणजे काय तु सुध्दा तशी श्रद्धा ठेवते जसे ते ठेवतात? व तुला तशी कठीणता हवी आहे का धर्मात? त्या उत्तरल्या: मी हरुरीया पैकी नाही, माई आईशा रजिअल्ला अनहा म्हणाली की:प्रेषितांच्या काळात मासीक पाळी आली असता,व त्या काळात आम्ही नमाज व रोजा ऊपवास सोडुन देणं होतो, प्रेषित सल्लल्लाहु अलैही व सल्लम आम्हाला रोजा ची कजा [पुन्हा] चा आदेश देत असत, परंतु नमाज पुन्हा अदा करण्याचा आदेश देत नव्हते.

فوائد الحديث

जो कोणी कठोर मनोवृत्तीने आणि वादविवादासह प्रश्न विचारतो त्याच्यावर नकार केला जाईल.

हुरुरिया हे कूफाच्या जवळील 'हुरुरा

' नावाच्या गावाशी संबंधित आहे: हा खवारिजचा एक संप्रदाय आहे, ज्याला त्यांच्या कट्टरपणामुळे, अनेक प्रश्न निर्माण करण्यामुळे आणि कठोर वर्तनामुळे त्यांच्यासोबत साम्य दाखवले गेले आहे.

ज्ञान आणि मार्गदर्शनाच्या शोधात येणाऱ्यांना समजावून सांगणे ही शिक्षकाची जबाबदारी आहे.

सर्वप्रथम पुरावा वापरून उत्तर द्या; कारण हज़रत आयशा रजिअल्लाहु अनहा यांनी त्या अर्थावर चर्चा केली नाही जी प्रश्न करणाऱ्याने विचारली होती, कारण पुराव्यांसह दिलेले उत्तर वाद मिटवते.

अल्लाह आणि त्याच्या रसूल सल्लल्लाहु अलैही वसल्लम च्या हुकूमाला मान्य करणे, जरी मनुष्याला हिकमतची माहीत नसली तरी.

नवावी रहमाउल्लाह यांनी म्हटले: हज़रत आयशा रजिअल्लाहु अनहा यांच्या म्हणीचा अर्थ असा आहे की खवारीजचा

एक संप्रदाय मासिक पाळीच्या वेळी चुकलेली नमाज पाळणे अनिवार्य ठरवतो, आणि हे मुस्लिमांच्या सर्वमताच्या विरोधात आहे, आणि हा प्रश्न जो हज़रत आयशाने विचारला, तो नाकारात्मक प्रश्न आहे, म्हणजे: ही हुरुरिया पद्धत आहे आणि खूप वाईट पद्धत आहे.

التصنيفات

Menses, Postpartum Bleeding, Extra-Menses Bleeding, Fasting Missed Days of Ramadaan