शैतान स्वतासाठी असे जेवण वैध करतो, ज्या घासावर अल्लाहचे

शैतान स्वतासाठी असे जेवण वैध करतो, ज्या घासावर अल्लाहचे

हुझैफा रजिअल्लाहु अनहु सांगतात: जेव्हा आम्ही प्रेषितांसोबत [अल्लाहची सलामती असो त्यांच्यावर] जेवण करायचो, तर आम्ही तोपर्यंत आपले हात ताटात टाकत नव्हतो, जोपर्यंत प्रेषित मुहम्मद सल्लल्लाहु अलैही व सल्लम आपल्या पवित्र हाताने सुरुवात करत नसत, एकदा आम्ही प्रेषितां समवेत भोजनाला बसलो असतांना, अचानक एक मुलगी धावत आली, जणुकाही तिचा कुणी पाठलाग करत असेल, तिने आपले हात सरळ ताटात टाकले परंतु प्रेषितांनी तिचा हात धरला, त्याबरोबर एक खेड्याचा माणुस आला व त्याने सुद्धा ताटात हात टाकला, त्याचा हात सुद्धा प्रेषितांनी सल्लल्लाहु अलैही व सल्लम नी पकडला, मग प्रेषितांनी सल्लल्लाहु अलैही व सल्लम नी आम्हाला सांगितले की<<शैतान स्वतासाठी असे जेवण वैध करतो, ज्या घासावर अल्लाहचे नाव न घेतल्या गेले,म्हणुनच शैतान ने या मुलाला आणले, ज्याने त्याला भोजन वैध होईल, म्हणुन मी त्याचा हात पकडला, मग त्या शैतान खेड्याच्या माणसाला घेउन आला, ज्याद्वारे त्याला जेवण हलाल म्हणजे वैध होईल, मग मी त्याचाही हात पकडला, ज्मग प्रेषित मुहम्मद सल्लल्लाहु अलैही व सल्लम म्हणाले, शपथ आहे, त्याची ज्याच्या हातात माझा जिव आहे! शैतान चा हात त्या मुलाच्या हातासोबत माझ्या हातात आहे, मग प्रेषितांनी सल्लल्लाहु अलैही व सल्लम नी अल्लाह चं नाव घेतलं व भोजन केलं>>.

[صحيح] [رواه مسلم]

الشرح

हुझैफा रजिअल्लाहु अनहु सांगतात की जेव्हा आम्ही प्रेषितांसोबत जेवण करत होतो, तेव्हा तोपर्यंत आम्ही ताटात हात टाकत नव्हतो, जोपर्यंत प्रेषित सुरू करत नव्हते, एक मुलगी धावत आली व ताटात हात टाकु लागली, व बिसमील्लाह [अल्लाहच्या नावाने] न म्हणता घास घेण्याच्या बेतात होती, तिचा हात प्रेषितांनी पकडला, त्यानंतर तिथे एक खेड्याचा माणुस आला व त्याने सुद्धा ताटात हात टाकण्याचा प्रयत्न केला, त्याला सुद्धा प्रेषितांनी रोकले, त्यानंतर प्रेषितांनी सल्लल्लाहु अलैही व सल्लम नी सोबत्यांना सांगितले की: त्या मुलीला व माणसाला शैतान घेउन आला होता, व त्याद्वारे त्याचा प्रयत्न असा होता की, बिस्मिल्लाह न म्हणता जेवण सुरू केल्याने, ते जेवण त्याच्या करता [हलाल ] वैध झाले असते, मग प्रेषितांनी सल्लल्लाहु अलैही व सल्लम नी अल्लाह ची शपथ घेउन सांगितले की त्या दोघांच्या हाता सोबत शैतान चा हात प्रेषितांच्या हातात होता.

فوائد الحديث

सहाबांचा प्रेषितांसोबत [सल्लल्लाहु अलैही व सल्लम] आदर व मोठेपण सिद्ध होतो.

जेवतावेळी मोठ्या चा आदर करणे व वडीलधारी मंडळी ची सुरु करण्याची वाट पाहणे.

शैतान काही वाईट लोकांना असे क्रुत्य करण्यास प्रवृत्त करतो, ज्याला तो पसंद करतो, याचै जिवंत उदाहरण वरील हदिस मधे सरळ दिसते.

ईमाम नववी रहमतुल्लाह सांगतात की:धर्मज्ञानी मानतात की: बिस्मिल्लाह चा उच्चार जोराणे करणे पसंद आहे, जेणेकरून दुसऱ्याने ऐकुन त्याचे अनुकरण करावे.

जर कुणी जेवण करताना, तुम्ही त्याला *बिस्मिल्लाह* ने सुरु करताना पाहिले नाही तर त्याचा हात पकडावा तोपर्यंत तो बिस्मिल्लाह म्हणत नाही.

ज्याच्याजवळ ज्ञान असेल त्याला जरुरी आहे की त्याने वाईटाला रोकावे व ज्याच्या जवळ ताकत असेल त्याला अनिवार्य आहे की त्याने पुर्ण ताकतीने वाईट सवयी ना थांबवावे.

ही सुंदर हदिस प्रेषितांना मिळालेल्या चमत्कारापैकी एक आहे, कारण सर्वोच्च अल्लाह ने प्रेषितांना या उदाहरणात पुढे घडणाऱ्या घटना बाबत माहिती दिली आहे.

शैतान ईमान धारकांच्या भोजनावर तोपर्यंत काबीज होऊ शकत नाही, जोपर्यंत जेवणावर साक्षात अल्लाह चे नाव घेतल्या जात नाही.

ईस्लाम धर्मात लोकांना खाणे पिण्याविषयी श्रीक्षण देणे सत्कर्मच आहे.

एखादी गोष्ट शपथ घेऊन सांगणे बरोबर आहे, कारण ऐकणारा ला शाश्वती व्हावी.

ईमाम नववी रहमतुल्लाह म्हणतात की: पाणी,दुध, औषधं, व ईतर प्येय घेताना *बिस्मिल्लाह* म्हणणे असेच आहे जसे जेवणाच्या सुरुवातीला आपण म्हणतो.

ईमाम नववी रहमतुल्लाह म्हणतात की,जर कुणी जेवतांना, *बिस्मिल्लाह* जाणुन बुजुन म्हटलं नाही, किंवा विसरल्या मुळे, किंवा जबरदस्तीने किंवा एखाद्या मजबुरीने उच्चारलं नसेल तर "बिस्मिल्लाह अव्वलु व आखीरहु"म्हणावं;कारण प्रेषित मुहम्मद सल्लल्लाहु अलैही व सल्लम नी फरमाविले की:"तुमच्यापैकी कुणी जेवण करत असेल तर अल्लाह चं नाव घ्यावे, व जर सुरुवातीला विसरल्या " बिस्मिल्लाह अव्वलु व आखीरहु ",

या हदिस ला अबु दाउद व तिरमीजी ने नमुद केले आहे.

التصنيفات

Manners of Eating and Drinking