जर तु संयम ठेवला तर त्याचा बदल्यात तुला जन्नत मिळेल, किंवा मी तुझ्या तंदुरुस्तीसाठी अल्लाह जवळ दुआ याचना करतो

जर तु संयम ठेवला तर त्याचा बदल्यात तुला जन्नत मिळेल, किंवा मी तुझ्या तंदुरुस्तीसाठी अल्लाह जवळ दुआ याचना करतो

अब्दुल्ला बिन अब्बास रजिअल्लाहु अनहु द्वारा निवेदन आहे की: त्यांनी अता बिन रबाह ला विचारले की,काय मी तुम्हाला साक्षात जिवंत जन्नती {स्वर्गात जाणारी} महिला न दाखवु ? त्यावर अता बिन रबाह म्हणाले की, जरुर दाखवा! इब्ने अब्बास रजिअल्लाहु अनहु नी सविस्तर वर्णन केले,एक काळी महिला प्रैषितां जवळ आली व म्हणाली की,मला मिरगी चे झटके येतात व त्यात माझं अंग नग्न होतंय, माझ्या करता अल्लाह जवळ दुआ करा! प्रेषित मुहम्मद सल्लल्लाहु अलैही व सल्लम म्हणाले<<जर तु संयम ठेवला तर त्याचा बदल्यात तुला जन्नत मिळेल, किंवा मी तुझ्या तंदुरुस्तीसाठी अल्लाह जवळ दुआ याचना करतो>>त्यावर ती महिला म्हणाली की: मी सब्र व संयम ठेवणार.नंतर म्हणाली की:माझं अंतरंग नग्न होऊ नये ,एवढीच अल्लाह कडे दुआ करा! किंबहुना प्रेषितांनी तिच्या करता दुआ केली.

[صحيح] [متفق عليه]

الشرح

वरील हदिस मधे याबाबत सविस्तर वर्णन आहे की,ईब्ने अब्बास रजिअल्लाहु अनहु नी आपले शिष्य अता बिन रबाह [अल्लाह रहम करो]ला सांगितले की,काय मी तुम्हाला एक स्वर्गीय महिला न दाखवु? त्यावर ते म्हणाले,का नाही! त्यावर इब्ने अब्बास रजिअल्लाहु अनहु या हबशी [निग्रो] महिला ला बघा तिला मिरगी चे झटके येत असत व त्यामुळे ति नग्न होत असे, तिनं प्रेषितांना या विषयी सांगितले व‌ प्रेषितांना विनवणी केली की तुम्ही माझ्या करता दुआ करा! ज्यामुळे मला या आजारापासुन मुक्ती मिळेल, त्यावर प्रेषित मुहम्मद सल्लल्लाहु अलैही व सल्लम म्हणाले की,तु म्हणतेस तर मी अल्लाह कडे दुआ करतो व जर तुझी मर्जी असेल तर तु सब्र व संयम बाळग त्या बदल्यात तुला [जन्नत] स्वर्ग मिळे, ती चटकन उत्तरली की: जरुर संयम ठेवते, तदनंतर ती महिला प्रेषितांना म्हणाली की: हे अल्लाह च्या प्रेषिता! मिरगी च्या अवस्थेत माझं अंतरंग नग्न होते, फक्त अल्लाह कडे दुआ करा की माझं अंग नग्न होऊ नये, किंबहुना प्रेषितांनी सल्लल्लाहु अलैही व सल्लम नी दुआ केली की, ती नग्न न व्हावी! तद्नंतर तिला मिरगी चे झटके तर येत, पण तीचं अंतरंग दिसत नसे.

فوائد الحديث

या जगात संकटावैळी संयम ठेवणे जन्नत मधे दाखल्याचा मार्ग आहे.

ईमाम नववी रहमतुल्लाह सांगतात की मिरगी च्या आजारावर सर्वात जास्त पुण्य आहे.

साहाबा रजिअल्लाहु अनहु च्या पत्न्यांची पडद्या व शिलजतना च्या वातावरणाने त्या महिलेला सर्वात जास्त भिती आपल्या पडदा खुलण्याची झाली.

ईब्ने हजर रहमतुल्लाह सांगतात की,ज्या माणसाला आपली सहनशक्ती माहीत असेल व जर तो कमकुवत होत नसेल तर त्याने सहन करणे न करण्यापेक्षा बेहतर आहे.

ईब्ने हजर रहमतुल्लाह सांगतात की,तमाम आजारावर रामबाण व अत्यंत फायदा असणारा ईलाज अल्लाह कडे दुआ आहे तसेच पुर्ण ईमान इतबारे अल्लाह कडे परतणे आहे, या ईलाज पद्धतीचा फायदा औषध प्रणाली पेक्षा कितीतरी पटीने अधिक आहे, परंतु या अध्यात्मिक इलाजासाठी दोन अटी पुर्ण असणे जरुरी आहेत,

एक अट आजारी करता आहे, त्याचा इरादा व नियत हेतु शुद्ध असला पाहिजे,

दुसरी अट ईलाज करणाऱ्या साठी आहे --त्याचे ईशभिरुता व अल्लाह वर गाढ विश्वास असावा.

इब्ने हजर रहमतुल्लाह सांगतात की,या हदिस मध्ये औषधोपचार न करण्याचं प्रमाण सिद्ध होते,

या चा अर्थ आहे,जर कुणी आजारी असुन औषधोपचार व ईलाजपाणी करण्याची इच्छा नसली तर हे शरीयत नुसार वैध आहे.

التصنيفات

Belief in the Divine Decree and Fate, Spiritual and Physical Therapy, Rulings of Women