माणसाची आपल्या भावा साठी पण त्याच्या पाठीमागे केलेली याचना [दुआ]स्वीकारल्या

माणसाची आपल्या भावा साठी पण त्याच्या पाठीमागे केलेली याचना [दुआ]स्वीकारल्या

उम्मे दरदा रजिअल्लाहु अनहा द्वारा निवेदन आहे की, प्रेषित मुहम्मद सल्लल्लाहु अलैही व सल्लम नी फरमाविले: <<माणसाची आपल्या भावा साठी पण त्याच्या पाठीमागे केलेली याचना [दुआ]स्वीकारल्या जाते, त्याच्या डोक्यावर एक [फरिश्ता] दुत नेमलेला असतो, आणी जेव्हा जेव्हा तो आपल्या भावासाठी [दुआ]भलाई ची याचना करतो, तेव्हा तो नेमलेला दुत म्हणतो:आमीन , तुझ्यावर सुद्धा अशाचप्रकारे भलाई उतरावी>>.

[صحيح] [رواه مسلم]

الشرح

मुसलमानाची आपल्या भावासाठी त्याच्या पाठीमागे केलेली याचना अल्लाह जवळ स्वीकारल्या जाते, जेव्हा एक मनुष्य आपल्या भावा करता याचना करतो,दुतांपैकी एक दुत त्याच्या डोक्यावर येऊन उभा राहतो, व म्हणतो आमीन तुझ्या नशीबी सुद्धा तिच भलाई यावी,ज्याची तु आपल्या भावा करता याचना करत आहेस.

فوائد الحديث

मुसलमानांना एकमेकांसाठी खुपच सुंदर व्यवहार करण्याची सवय लावणे, इथपर्यंत की त्यांनी एकमेकांसाठी दुआ याचना करावी.

कुणासाठी त्याच्या पाठीमागे दुआ याचना करणे ईमान व बंधुभावा चे प्रतीक आहे.

पाठीमागे केलेली याचना, ज्यात निस्वार्थ पणा जास्त असतो .

आपली दुआ स्वीकार योग्य बनवण्यासाठी सोपा उपाय म्हणजे आपल्या भावा करता त्याच्या पाठीमागे त्याच्या साठी दुआ करणे.

इमाम नववी रहमतुल्लाह सांगतात की:मुसलमान बांधवांसाठी त्याच्या पाठीमागे दुआ करणे,फार उच्चतम आचरण आहे.जर कुणी मुसलमानांच्या समुहासाठी दुआ करत असेल तरीही हे पुण्य लाभते, जर कुणी काही ठराविक मुसलमानांसाठी दुआ करत असेल तर त्याला सुद्धा हे पुण्य मिळेल, पुर्वज (सलफ)जेव्हा स्वतः करता दुआ करत होते, तेव्हा ते आपल्या मुसलमान बांधवांसाठी सुद्धा दुआ याचना करत असत, कारण दुआ याचना स्वीकारल्या जाते,तसेच ते सर्व मिळते जे तुम्ही आपल्या बांधवाकरता मागता.

सर्वोच्च अल्लाह ने काही विशेष कर्मावर दुतांची नियुक्ती केली आहे, त्यापैकी एक सत्कर्म ही दुआ याचना आहे.

التصنيفات

Belief in the Angels, Merits of Supplication