हे अल्लाह च्या प्रेषिता [अल्लाह ची सलामती असो त्यांच्यावर]! जर कुणी जबरदस्तीने माझा माल हिसकावुन घेतला तर मी काय…

हे अल्लाह च्या प्रेषिता [अल्लाह ची सलामती असो त्यांच्यावर]! जर कुणी जबरदस्तीने माझा माल हिसकावुन घेतला तर मी काय करू?

अबुहुरैरा रजिअल्लाहु अनहु कथन वर्णन करतात की: एक व्यक्ती प्रेषित मुहम्मद सल्लल्लाहु अलैही व सल्लम जवळ आला, विचारणा करु लागला की:हे अल्लाह च्या प्रेषिता [अल्लाह ची सलामती असो त्यांच्यावर]! जर कुणी जबरदस्तीने माझा माल हिसकावुन घेतला तर मी काय करू? त्यावर प्रेषित मुहम्मद सल्लल्लाहु अलैही व सल्लम उत्तरले की:<<तुम्ही तुमचा माल देता कामा नये>>त्याने पुन्हा प्रश्न केला की: जर त्याने माझ्यावर हल्ला केला तर? पैगंबर सल्लल्लाहु अलैही व सल्लम म्हणाले: <<तुम्ही सुद्धा प्रतिकार करावा>> त्याने पुन्हा प्रश्न केला की,जर त्याने माझा खुन केला तर? त्यावर प्रेषित मुहम्मद सल्लल्लाहु अलैही व सल्लम उत्तरले की अशा परिस्थितीत तर <<तुला शाहिद चा दर्जा मिळेल>>पण त्याने प्रतिप्रश्न केला की जर मी त्याचा खात्मा केला तर? प्रेषित [अल्लाह ची सलामती असो त्यांच्यावर] म्हणाले:<<मग तर तो नरकाच्या अग्नीत टाकल्या जाईल>>.

[صحيح] [رواه مسلم]

الشرح

प्रेषित मुहम्मद सल्लल्लाहु अलैही व सल्लम जवळ एक व्यक्ती आला, व म्हणाला की: हे,प्रेषिता! मला सांगा,जर कुणी नाहक माझी मालमत्ता हिसकावुन घेत असेल तर मी काय करू? प्रेषितांनी सल्लल्लाहु अलैही व सल्लम नी त्याला सांगितले की त्याला तुझी मालमत्ता देऊ नको पण त्याने विचारले की: जर त्याने माझ्याशी लढाई केली तर‌? त्यावर प्रेषित म्हणाले की तुम्ही प्रतिकार करा, त्याने पुन्हा विचारले की: जर तो वरचढ राहला व‌मला त्याने नाहक माझा जिव‌ घेतला तर? प्रेषित मुहम्मद सल्लल्लाहु अलैही व सल्लम म्हणाले की तुम्हाला *शहिद* चा दर्जा मिळेल, पण त्याने पुन्हा विचारले की: जर मी त्याला मारले तर ? प्रेषित [अल्लाह ची सलामती असो त्यांच्यावर] म्हणाले की तो व्यक्ती ठराविक काळासाठी नरकात टाकल्या जाईल.

فوائد الحديث

ईमाम नववी रहमतुल्लाह सांगतात की:आपल्या संपत्ती व इज्जत चे रक्षण अनिवार्य आहे,

व‌ आपल्या जिवाच्या रक्षणाखातर जर समोरच्या व्यक्तीचा जिव घेण्याच्या विषयात मतभेद आहेत,

परंतु संपत्ती च्या रक्षणाकरता लढणे वैध आहे परंतु अनिवार्य नाही.

सदर हदिस वरुन सिद्ध होते की आचरण करण्या पूर्वी ज्ञान संपादन करणे जरुरी आहे, कारण एका सहाबी ने प्रेषितांना आचरण करण्या पूर्वी च प्रश्न केला की माझ्यावर‌ काय अनिवार्य आहे.

प्रथम हल्लेखोराला इशारा देऊन किंवा मदत मागून थांबवण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि जर तो लढण्याचा आग्रह धरत असेल तर त्याला मारण्यावर नव्हे तर त्याचा हल्ला थांबवण्यावर लक्ष केंद्रित केले पाहिजे.

मुसलमानाचं रक्त, संपत्ती,व त्याची इज्जत घेणे हराम आहे.

ईमाम नववी रहमतुल्लाह म्हणतात की:जाणुन घ्या कि शहिद तिन‌ प्रकारचे असतात;

अ) तो व्यक्ती जो काफीरां [नास्तिकासोबत] सोबत युद्ध करतांना मारल्या गेल्यास त्याला जगभरात व म्रुत्युनंतर सुद्धा निसंदेह त्याला शहिद चा दर्जा प्राप्त होईल,

म्हणजे परलोकात त्याला शहिद चा दर्जा व पुण्य प्राप्त होईल, व या जगात त्यांच्याविषयी आदेश आहे की, त्याला गुस्ल म्हणजे म्रुत्यु नंतर आंघोळ दिल्या जाणार नाही,व ना त्याच्याकरता नमाज ए जनाजा अदा केल्या जाईल.

ब) तो व्यक्ती जो फक्त आखीरत मधे शहिद संबोधल्या जाईल ,या जगात नाही.

जसं पोटाच्या विकारांने मरण पावणारा,महामारीत मरण पावणारा,उंच इमारती वरुन पडुन मेलेला,व तो व्यक्ती जो आपल्या आईच्या संरक्षणात मारल्या गेला असेल,व ईतर लोकं ज्यांना शहिद म्हटल्या जाते,

अशा लोकांन निसंदेह गुस्ल आंघोळ दिल्या जाईल, व नमाज ए जनाजा अदा केल्या जाईल, परंतु आखीरत मधे यांना शहिद चा दर्जा मिळेल, परंतु शक्य आहे की त्यांना पहिल्या शहिद च्या दर्जा सारखा [लढाईत मारल्या गेलेल्या]दर्जा मिळणार नाही.

तिसरा प्रकार त्या व्यक्तीचा आहे,जो मुसलमानांच्या सामुहिक संपत्ती मधे चोरी करणारा किंवा तत्संबंधी गुन्हा करणारा, परंतु काफीरांसोबत युद्धात मरण पावणारा,

अशा व्यक्तींना या जगात शहिद चा दर्जा दिल्या जाईल, परंतु त्याला गुस्ल आंघोळ दिल्या जाणार नाही व नमाज जनाजा अदा केल्या जाणार नाही.

परंतु आखीरत मधे त्याला पुर्ण शहिद चा दर्जा मिळणार नाही.

التصنيفات

Shariah Objectives, Condemning Sins