अबु बक्र,हे त्या दोन लोकांविषयी तुझं काय मत आहे, ज्यांच्या सोबत तिसरा अल्लाह असेल

अबु बक्र,हे त्या दोन लोकांविषयी तुझं काय मत आहे, ज्यांच्या सोबत तिसरा अल्लाह असेल

अबुबक्र सिद्दीक रजिअल्लाहु अनहु सविस्तर वर्णन करतात की: आम्ही दोघं गुफेत असतांना,मी अनेकेश्वरवादी लोकांच्या पायाकडे बघितले,ते आमच्या जणुकाही डोक्यावर होते,मी म्हटले:हे अल्लाह च्या प्रेषिता ! यांच्या पैकी कुणी जर त्यांच्या पायाखाली बघितलं तर ते आम्हाला बघतील, त्यावर प्रेषित उत्तरले:<<अबु बक्र,हे त्या दोन लोकांविषयी तुझं काय मत आहे, ज्यांच्या सोबत तिसरा अल्लाह असेल>>.

[صحيح] [متفق عليه]

الشرح

अबु बक्र रजिअल्लाहु अनहु नी हिजरत [मक्का सोडता वेळी] च्या वेळी म्हटलं होतं की: हे अल्लाह च्या प्रेषितां! {अल्लाह ची सलामती असो त्यांच्यावर} यांच्या पैकी कुणी जर पाया खाली बघितलं तर आम्ही त्यांच्या पायाखाली च आहोत, त्यावर प्रेषित मुहम्मद सल्लल्लाहु अलैही व सल्लम नी फरमाविले की:हे अबु बक्र, त्या दोन लोकांविषयी तुझं काय मत आहे की ज्यांचा तिसरा साक्षात अल्लाह असेल?!

فوائد الحديث

अबु बक्र सिद्दिक [अल्लाह राजी असो यांच्याशी] चि विशेषतः ही आहे की ते हिजरत च्या वेळी पैगंबरांसोबत होते, त्यांनी सगळ्याच प्रकारचा त्याग केला, मग ती आपल्या आप्तेष्टांना सोडुन देणं असो की आपली संपत्ती खर्च करणे असो.

अबु बक्र सिद्दिक रजिअल्लाहु अनहु चं पैगंबरांवरील प्रेम इतकं अतुट होतं की ते नेहमीच पैगंबरांच्या [सल्लल्लाहु अलैही व सल्लम]दुश्मनाविषयी चिंतेत असायचे.

अल्लाह वर भरोसा करणे अत्यावश्यक आहे, आणी हा विश्वास बाळगणे जरुरी आहे की अल्लाह आमचे रक्षण करतो, या धर्तीवर की आम्ही आपल्या परीने काळजी घ्यावी.

अल्लाह आपल्या खास पैगंबरांची व खास दोस्तांचे विशेष रक्षण करतो, त्यांना विजय व मदत प्रदान करतो;

जसं कुरआन ची स्पष्टोक्ती आहे की: (निःसंशय आम्ही आपल्या पैगंबरंना व श्रद्धावंतांना, या जगात व पुनरुत्थानाच्या दिवसी ग्वाही करता उभं केल्या जाईल, आम्ही जरुर मदत करु).

जो व्यक्ती अल्लाह वर‌ विश्वास ठेवतो, तर अल्लाह त्याच्या साठी पुरेसा असतो, त्याची मदत करतो, संरक्षण करतो,व त्याला सांभाळतो.

प्रेषित मुहम्मद सल्लल्लाहु अलैही व सल्लम यांचे एकमेव अल्लाह वर गाढ विश्वास, प्रतिक आहे की प्रेषित प्रत्येक गोष्टीत अल्लाह वरच विश्वास ठेवत असत, व आपलं प्रत्येक काम अल्लाह च्या स्वाधीन करत असत.

प्रेषितांचे धैर्य देणे, ह्रद्यांना व आत्म्यांना विश्वास देणे, एक उच्चतम कार्य आहे.

शत्रू च्या भितीने धर्माचे संरक्षण करणे व त्याकरता उपाययोजना करणे जरुरी आहे.

التصنيفات

Seerah and History, The Emigration (Hijrah)